Anurag Kashyap On Boycott Trend : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा सध्या त्याच्या दोबारा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं अनुराग प्रमोशन करत आहे. अनुरागच्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि अभिनेता पवेल गुलाटी हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तापसी आणि अनुराग हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. त्यांच्या वक्तव्यांची चर्चा नेहमी सोशल मीडियावर होते. सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या बायकॉट ट्रेंडवर अनुराग आणि तापसीनं एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाला अनुराग? 
मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपला बायकॉट ट्रेंडबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत अनुराग म्हणाला, 'मला या गोष्टीची सवय झाली आहे. ज्यांचे चित्रपट 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करतात अशा लोकांवर याचा परिणाम होतो. माझे चित्रपट 32 कोटींपेक्षा जास्त कमाई करत नाहीत. त्यामुळे माझ्यावर याचा काही परिणाम होत नाही. जेव्हा पासून ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पासूनच मी बायकॉट होत आहे. त्यामुळे मला प्रभावित करणारे प्रश्नच मला विचारा.' पुढे अनुराग म्हणाला, मी बऱ्याच दिवसांपासून बायकॉट झालो नाही.' यावर तापसी म्हणाली, 'मनमर्जिया चित्रपटानंतर अनुरागचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला नाही. '


सोशल मीडियावरील बायकॉट ट्रेंड 
सोशल मीडियावर सध्या बायकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. लाल सिंह चड्ढा आणि रक्षा बंधन या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत आहेत. तसेच पठाण आणि ब्रह्मास्त्र हे चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या चित्रपटांना देखील बायकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. 


अनुराग कश्यपचा दोबारा हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यामधील अनेक कलाकारांनी चित्रपटामधील तापसीच्या अभिनयाचं कौतुक केलं. 


पाहा दोबारा चित्रपटाचा ट्रेलर:



वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: