Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. इस्त्राइलमधील (Israel) युद्धाच्या भडक्यात अभिनेत्री अडकली असल्याचं समोर आलं आहे. तसेच अभिनेत्रीसोबत काहीही संपर्क होत नसल्याची टीमने माहिती दिली आहे.
'हमास'कडून इस्त्राइलवर हल्ला (Israel-Palestine Escalation) करण्यात आला. त्यानंतर इस्त्राइलने युद्धाची घोषणा करत त्यांना प्रत्युत्तर दिले. या युद्धात ठार झालेल्यांची संख्या आता 300 च्या पुढे गेली असून 1,590 लोक जखमी झाले आहेत. या युद्धाच्या भडक्यात अनेक भारतीय नागरिक इस्त्राइलमध्ये अडकले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचादेखील इस्त्राइलमध्ये अडकली असल्याचं सांगण्यात येत आहे.
नुसरतच्या टीममधील एका व्यक्तीने माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,"नुसरत भरुचा इस्त्राइलमध्ये अडकली आहे. हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ती इस्त्राइलला गेली होती. पण ता तिच्यासोबत काहीही संपर्क होत नाही आहे. शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अभिनेत्रीसोबत शेवटचा संप्रक झाला होता. त्यावेळी ती एका बेसमेंटमध्ये सुरक्षित असल्याचं तिने सांगितलं होतं".
नुसरतचा 'अकेली' (Akeli) हा सिनेमा ऑगस्ट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातही इराकमधील युद्धात अडकलेल्या एका मुलीचा घरी परतण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला होता. या सिनेमात नुसरतच्या दर्जेदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. पण सिनेमातल्या कथेप्रमाणे आता नुसरत इस्त्राइलमध्ये झालेल्या युद्धात अडकली आहे. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
नेमकं प्रकरण काय? (Israel-Palestine Escalation)
गाझा पट्टीतून इस्त्राइलच्या तीन शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवाद्यांमधील संघर्ष जुना असला तरी आता पुन्हा पॅलेस्टानी संघटना हमासने पुन्हा एकदा इस्त्राइलवर हल्ला करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. या हल्ल्यानंतर इस्त्राइलनेदेखील त्यांना चोख उत्तर दिलं आहे. हवाई हल्ले करत त्यांनी प्रत्युत्तर दिलं. पण या युद्धात इमारती उद्धवस्त झाल्या असून काहीशे लोकांचं निधन झालं आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये 5000 रॉकेट डागल्याचा हमासने दावा केला आहे.
संबंधित बातम्या