Single Movie:  अभिनेते रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) उर्फ पिट्याभाई हे लवकरच ‘सिंगल’ (Single) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात ते ‘नगरसेवक राजाभाऊ  सूर्यवंशी’  ही  भूमिका ते साकारणार आहेत.  नुकतेच सिंगल चित्रपटामधील 'नगरसेवक' हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.


27 ऑक्टोबरला ‘सिंगल’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याआधी या चित्रपटामधील 'नगरसेवक' हे गाणं रिलीज करण्यात आलं. या गाण्यात प्रथमेश परबचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे.


‘सिंगल’ चित्रपटाबाबत रमेश परदेशी यांनी सांगितलं, "‘सिंगल’ च्या निमित्ताने मी प्रथमच पडद्यावर एका राजकारणी व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतोय. राजकारणआणि  समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. राजाभाऊ सूर्यवंशी या भूमिकेने मला ही वेगळी संधी दिली असून माझी ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल. "


पाहा गाणं:






दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी ‘सिंगल’ चित्रपटाचे दिगदर्शन केले आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे  यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.


सिंगल चित्रपटाची स्टार कास्ट


सिंगल या चिपटात प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड, राजेश्वरी खरात, रमेश परदेशी, सुशांत दिवेकर, सुरेश विश्वकर्मा या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक सिंगल या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.






महत्वाच्या बातम्या :  


Marathi Movies: ऑक्टोबर महिन्यात मनोरंजनाचा धमाका; 'हे' मराठी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला