Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Record : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतरही जगभरातील सिनेरसिकांमध्ये आणि शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे.  आता पुन्हा एकदा जगभरात 1103.6 कोटींची कमाई करत या सिनेमाने इतिहास रचला आहे. 


'जवान' (Jawan Movie) या सिनेमाला भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत नसला तरी परदेशात मात्र हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. विक्रम राठौड आणि त्याच्या मुलाच्या गोष्टीने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. त्यामुळे शाहरुखच्या 'जवान'ने नवा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 2023 या वर्षातला 'जवान' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडपट ठरला आहे.






'जवान'ने जगभरात केली 1103.6 कोटींची कमाई (Jawan Box Office Collection)


अॅटली कुमार (Atlee Kumar) दिग्दर्शित 'जवान' (Jawan) या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जात आहेत. अॅटली कुमारने 'जवान'च्या कमाईबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"जवान' हा सिनेमा प्रत्येक दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे...लवकरात लवकर तुम्ही तिकीट बूक करा..'जवान' हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहा-हिंदी, तामिळ आणि तेलुभू भाषेत". 'जवान'ने जगभरात 1103.6 कोटींची कमाई केली आहे.


शाहरुखची दुहेरी भूमिका! (Jawan Starcast)


'जवान' या सिनेमात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसून आला आहे. विक्रम राठौड आणि त्याच्या मुलाची भूमिका किंग खानने चोख बजावली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची झलकही या सिनेमात पाहायला मिळत आहे. नयनताराने या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. विजय तेसुपती या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत आहे. तसेच प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक, लहर खान आणि आलिया कुरैशीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Jawan Box Office Collection : शाहरुखच्या 'जवान'च्या कमाईत घसरण सुरुच; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...