Urvashi Rautela on Sushmita Sen : उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. या अभिनेत्रीने 2015  मध्ये भारतातून ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भाग घेतला होता. उर्वशीने 'सनम रे', 'हेट स्टोरी 4', 'पागलपंती', 'काबिल' सारखे चित्रपट केले आहेत. ही अभिनेत्री तिच्या अनेक गोष्टींमळे चर्चेत येत असते. नुकतच तिने मिस युनिव्हर्स असलेल्या सुष्मिता सेनवर ( Sushmita Sen) गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उर्वशीने याबाबत खुलासा केला. 


'मिर्ची प्लस'शी संवाद साधताना उर्वशी रौतेलाने 1994 मध्ये मिस युनिव्हर्स जिंकलेल्या सुष्मिता सेनने तिला 2012 मध्ये मिस युनिव्हर्स इंडियाच्या विजेत्याच्या शर्यतीतून बाहेर पडण्यास कसे सांगितले याबाबत खुलासा केला. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प मिस युनिव्हर्सचे आयोजन करायचे. प्रॉडक्शन आणि सुष्मिता सेनची कंपनी भारतातून स्पर्धकांची निवड करत होती कारण फेमिना मिस इंडियाने त्यातून माघार घेतली होती. दरम्यान या स्पर्धेमध्ये मला वयोमर्यादेविषयी काहीही माहिती नव्हती. 


उर्वशी रौतेलाने सांगितला अनुभव


उर्वशीने म्हटलं की, 'जेव्हा मी 2012 मध्ये पहिल्यांदा मिस युनिव्हर्स इंडिया जिंकली तेव्हा मिस युनिव्हर्ससाठी वयाची मर्यादा होती. आमचे बॉस डोनाल्ड ट्रम्प होते. वयोमर्यादा 18 वर्षे होती, जिंकल्यानंतर मी 17 वर्षांची होते याची मला कल्पना नव्हती. मी वयाच्या मर्यादेपेक्षा 24 दिवसांनी लहान होते. वयोमर्यादेमुळे सुष्मिता सेनने थेट तिला मुकुट मिस युनिवर्सचा क्राऊन काढायला सांगितला. त्यावेळी मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव दिसला होता. 


सुष्मिता सेनने मला 'असं' सांगितलं


त्यावेळी वयोमर्यादेच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले पण माझे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्याशिवाय त्याच दरम्यान मी सिनेसृष्टीत येण्याचा देखील विचार केला होता. त्याला देखील सुष्मिताने विरोध केला होता. तिने मला म्हटलं की, उर्वशी तु नाही जाऊ शकत. त्यावेळी पुन्हा एका मला माझ्या आयुष्यतला पराभव झाल्यासारखं वाटलं. 


उर्वशीने पुन्हा 2015 मध्ये मिस दिवा आयोजित मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि तिने यश देखील प्राप्त केलं. उर्वशीने तो दिवस आठवला जेव्हा तिने ऑडिशनसाठी प्रवेश केला होता आणि इतर स्पर्धकांना कसे वाटले होते की ती परिक्षक म्हणून आली आहे. तिथल्या सर्व मुलींना मी सहभागी व्हावं असं वाटत नव्हतं त्यामुळे मी तिथे पूर्णपणे एकटी पडल्यासारखं मला वाटलं, असंही उर्वशीनं म्हटलं. 


ही बातमी वाचा : 


Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीची जाहिरातीत लागली रणवीर सिंहसोबत वर्णी, फोटो शेअर करत म्हणाली...