Jeh Ali Khan Attempts To Do Yoga : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे (Kareena Kapoor) अभिनयासोबत फिटनेसकडेदेखील लक्ष असते. करीनाच्या फिटनेसचे रहस्य मात्र योगा आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2022) करीनाने तिच्या लाडक्या लेकाचा जेह अली खानचा एक खास फोटो शेअर केला आहे. 


आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करीनाने जेह अली खानची एक खास झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोत जेह अली खान योगा करताना दिसत आहे. करीनाने लहानपणापासूनच जेहला योगाची आवड निर्माण केली आहे, याचा अंदाज याफोटोवरून चाहत्यांना येत आहे. 






करीनाच नाही तर सैफ अली खानचेदेखील फिटनेसकडे लक्ष असते. त्यामुळे दोघांनीही जेहला बालपणीपासूनच फिटनेस ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करीनाने तैमूरचा योगा करतानाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. तैमूर या फोटोत सैफ अली खानसोबत योगा करताना दिसत होता. 


करीनाचे आगामी सिनेमे


करीनाचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. बेबो लवकरच मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्डा' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या सिनेमाचा अधिकृत हिंदी रीमेक आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


International Yoga Day 2022 : मलायका ते शिल्पा ; या अभिनेत्रींचे फिटनेस सिक्रेट आहे 'योगा'


Priyanka Chopra, Nick Jonas : ‘मालती आणि मालतीचे बाबा’, प्रियांका चोप्राने शेअर केला निक जोनास अन् लेकीचा खास फोटो!