Priyanka Chopra, Nick Jonas : ‘नुकताच जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी देखील खास फोटो शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचनिमित्ताने अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिची मुलगी मालती मेरीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रियांकाने लेक मालती (Malti Merry) आणि पती निक जोनासचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दोघांचाही चेहरा दिसत नाही. फोटोमध्ये निक मालतीला धरून कॅमेराकडे पाठ करून उभा आहे.


प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोची खास गोष्ट म्हणजे मालती आणि तिचे वडील निक दोघांनीही मॅचिंग शूज परिधान केले आहेत. मालतीच्या प्रत्येक बुटावर एमएम लिहिलेले आहे. तर, निकच्या शूजवर एमएमचे बाबा लिहिलेले आहे. प्रियांकाने ‘फादर्स डे’ निमित्ताने तिचा पती निक जोनास आणि लेक मालतीला भेट म्हणून दिलेले हे कस्टमाइज्ड शूज खूप क्युट आहेत.


पाहा फोटो :



हा क्युट फोटो शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पहिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा माझ्या प्रेमा. आपल्या लहान बाळासोबत तुला पाहणं खूप सुखावणारं आहे. आज घरी परतण्याचा किती छान दिवस आहे... माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे..’


निकनेही शेअर केला फोटो


निकने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘माझ्या लहान लेकीसोबतचा पहिला फादर्स डे. खूप सुंदर फादर डॉटर-स्नीकर्स गिफ्ट केल्याबद्दल आणि मला डॅडी बनवल्याबद्दल @priyankachopra धन्यवाद! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सर्व वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा.’ NICU मध्ये 100हून अधिक दिवस ठेवल्यानंतर, निक आणि प्रियांकाने लेक मालती मेरीला यावर्षी ‘मदर्स डे’ला घरी आणले. प्रियांका आणि निक्ची मुलगी मालती हिचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.


प्रियांका कामात व्यस्त!


प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांका गेले काही दिवस या सीरिजचे शूटिंग करत आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच, प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच, कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


हेही वाचा :


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर


Rashmirekha Ojha : अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची आत्महत्या; लिव-इन-पार्टनर कारणीभूत असल्याचा वडिलांचा आरोप