International Yoga Day 2022 : बॉलिवूडमधील अभिनेत्री त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतात. काही अभिनेत्री या जिमध्ये जाऊन वर्क-आऊट करतात तर काही योगा करतात. काही अभिनेत्रींचे  फिटनेस सिक्रेट हे योगा आहे. आज 'अंतरराष्ट्रीय योगा डे' (International Yoga Day 2022) निमित्त जाणून घेऊयात कोणत्या अभिनेत्री या योगा करुन फिट राहतात...


करिना कपूर (Kareena Kapoor)
करिनानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तिला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात. पण वजन मेंटेन करण्यासाठी जिममध्ये वर्क आऊट करायला करिनाला आवडत नाही, असंही तिनं सांगितलं होतं. त्यामुळे करिना जिममध्ये जाण्याऐवजी योगा करते. करिना सोशल मीडियावर तिचे योगा करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. 






शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे. शिल्पा युट्यूब आणि  इंस्टाग्रामवर योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना योगा करण्यासाठी प्रेरित करते. 47 वर्षाच्या शिल्पाच्या फिटनेसचे सिक्रेट हे योगा आहे. शिल्पाच्या योगा सेशनच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 






मलाइका अरोरा (Malaika Arora)
48 वय असणारी अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका अनेकांना नियमित योगा करण्याचा सल्ला देते. 






लारा दत्ता (Lara Dutta)
अभिनेत्री लारा दत्ता  बॉलिवूडमधील फिटेस्ट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. लारा ही गोली 10 वर्ष योगा करत आहे. डीन पांडे यांनी लाराला योगाचं प्रशिक्षण दिलं आहे. लाराचे एक युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर लारा विविध आसनांची माहिती चाहत्यांना देते. 


योगा-डे ची यंदाची थिम


मन की बात या कार्यक्रमाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा-डेची यंदाची थिम सांगितली. ते म्हणाले, "21 जून रोजी आपण 8वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करणार आहोत. या 'योग दिवसाची संकल्पना (Theme) आहे - “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. तुम्हीही 'योग दिना'ची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना 'योग दिना'च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या."