Jaadugar Trailer : पंचायत (Panchayat) फेम अभिनेता जितेंद्र कुमारचा (Jitendra Kumar) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जादूगर' (Jaadugar) असे या सिनेमाचे नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 


अभिनेता जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) आणि आरुषी शर्मा (Arushi Sharma) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीदेखील (Jaaved Jaffrey) या सिनेमात फुटबॉल परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. समीर सक्सेना यांनी 'जादूगर' या सिनेमाच्या दिग्दर्शनची धुरा सांभाळली आहे. 






'जादूगर' हा नेटफ्लिक्सचा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र कुमार 'मॅजिक मीनू'चे पात्र साकारत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना चांगलीच जादू पाहायला मिळणार आहे. मीनू जादू करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. पण काही कारणांमुळे तो फुटबॉल खेळायला लागतो. या सिनेमात प्रेक्षकांना चांगलीच जादू पाहायला मिळणार आहे. 


15 जुलैला नेटफ्लिक्सवर होणार रिलीज


'जादूगर' सिनेमात प्रेक्षकांना जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्माची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 15 जुलैला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 'जादूगर'ची घोषणा झाल्यापासून जितेंद्र कुमारचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा क्रीडाविषयक असला तरी प्रेक्षकांना सिनेमात रोमान्सदेखील पाहायला मिळणार आहे. जितेंद्र कुमारची 'पंचायत' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. त्यामुळे प्रेक्षक आता 'जादूगर' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Jaadugar On Netflix : जितेंद्र कुमारच्या 'जादूगर'चा फर्स्ट लूक आऊट, नेटफ्लिक्सवर होणार रिलीज


Dobara Movie : तापसी आणि अनुरागच्या 'दोबारा'चा लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर