एक्स्प्लोर

Ideas of India 2024 : ब्लॉकबस्टर फिल्मचा फॉर्म्युला काय? 'जवान'चा अॅटली कुमारने सांगितलं

Ideas of India 2024 : ब्लॉकबस्टर चित्रपट कसा तयार  होतो, याचा उलगडा अॅटलीने केला. एबीपी नेटवर्कच्या 'आयडिया ऑफ इंडिया' या वार्षिक समिटमध्ये अॅटली सहभागी झाला होता. त्यावेळी तो बोलत होता. 

Ideas of India 2024 :  दाक्षिणात्य स्टार दिग्दर्शक आणि  किंग खानच्या 'जवान'  (Jawan Movie) चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा अॅटली कुमार ( Atlee Kumar ) सध्या चर्चेत आहे. 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत दिसली होती. 'जवान' ब्लॉकबस्टर ठरला होता. 2023 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट कसा तयार  होतो, याचा उलगडा अॅटलीने केला. एबीपी नेटवर्कच्या 'आयडिया ऑफ इंडिया' या वार्षिक समिटमध्ये अॅटली सहभागी झाला होता. त्यावेळी तो बोलत होता. 

'जवान' बाबत अॅटलीने काय सांगितले?

अॅटलीने सांगितले की, 'चित्रपटांना भाषेचे बंधन नसते. चित्रपट ही कला आहे, प्रेम आहे. तुम्ही जेव्हा एखादा चित्रपट मनापासून तयार करता तेव्हा भाषा कधीच अडथळा ठरत नाही. त्यामुळे मला हिंदी येत नाही. पण,  जसा चित्रपट तयार करायचा होता, तसा तयार केला. मी जी कलाकृती तयार केली, त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे अनुभवली. त्यामुळेच जवान सुपरहिट ठरला असे मला वाटते, असे अॅटलीने म्हटले. अमेरिकेत माझे चाहते आहेत त्यांना हिंदी समजत नाही. माझे हॉलिवूडचे चाहते आहेत ज्यांना हिंदी येत नाही. त्यामुळे मला वाटते की चित्रपट ही भावनांची बाब आहे.

शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

शाहरुखसोबत काम करण्याच्या अनुभवावर अॅटलीने सांगितले की,  मी शाहरुखचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. मला त्याचे सर्व चित्रपट आवडतात. डीडीएलजे, कुछ कुछ होता है, ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस, अशी लांबलचक यादी आहे. मला त्याच्याबद्दल एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्याची स्क्रीन प्रेझेन्स. त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. तो भारतीय चित्रपटसृष्टीचा जगातला चेहरा असल्याचे अॅटलीने सांगितले. शाहरुख खानसोबत काम करणे हे माझे स्वप्न होते आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मला माझ्या पाचव्या चित्रपटात त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असेही अॅटलीने सांगितले. 

सिनेजगतात असा प्रवास सुरू झाला...

अॅटलीने सांगितले की,'लहानपणी मला डान्समध्ये खूप रस होता. माझ्या आईच्या ॲकॉर्डियनमध्ये खूप चांगला डान्सर होतो. मी शालेय जीवनात कोरिओग्राफी करायला सुरुवात केली होती. त्यानंतर मी कोरिओग्राफीच्या माध्यमातून कथा मांडू लागलो. यातूनच माझी दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली असल्याचे अॅटलीने सांगितले. त्यानंतर मी शॉर्ट फिल्म बनवायला सुरुवात केली आणि मग शंकर सरांना असिस्ट केले. पाच वर्षे असिस्ट केल्यानंतर मी दिग्दर्शक झालो. एका डान्सर ते दिग्दर्शक असा माझा प्रवास असल्याचे अॅटलीने सांगितले.  

सेटवरच्या पहिल्याच दिवशी हरखून गेलो...

अॅटलीने सांगितले की, चित्रपटाच्या सेटवर माझा पहिला दिवस हा रजनीकांत सरांसोबत होता, तो चित्रपट होता रोबोट. त्यावेळी मी काहीसा हरखून गेलो होतो. मी शंकर सर, रजनीकांत सर,थलापती विजय सर आणि आता शाहरुख सरांसोबत काम केले आहे. 

चित्रपटात सामाजिक संदेश हवाच...

अॅटलीने पुढे म्हटले की, चित्रपटात सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे. देवाने मला चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी भाष्य करण्याची संधी दिली आहे तर मला माझ्या चित्रपटातून सामाजिक संदेश द्यायला हवा. चित्रपट निर्मिती करणारे जर चित्रपटाच्या माध्यमातून कमावत असतील तर प्रेक्षकांनीदेखील चित्रपटातून काहीतरी घेऊन जाणे आवश्यक आहे, असेही अॅटलीने म्हटले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटकDhananjay Deshmukh Meet Ujjwal Nikam : संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी, धनंजय देशमुख उज्वल निकमांच्या भेटीलाBhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटमABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Santosh Deshmukh Case & Walmik Karad: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी उज्ज्वल निकमांचा पहिला युक्तिवाद, विष्णू चाटेचं नाव घेत म्हणाले...
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी उज्ज्वल निकमांचा पहिला युक्तिवाद, विष्णू चाटेचं नाव घेत म्हणाले...
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
Shani Transit 2025:  29 मार्च तारीख चमत्कारिक! 7 ग्रहांचा भव्य महासंयोग! 12 राशींवर काय परिणाम होणार? कोणाचं भाग्य उजळणार?
29 मार्च तारीख चमत्कारिक! 7 ग्रहांचा भव्य महासंयोग! 12 राशींवर काय परिणाम होणार? कोणाचं भाग्य उजळणार?
Embed widget