IAA awards 2022 : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. आता बाजीराव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणवीरला आयएए (IAA) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. रणवीर सध्या 41 ब्रॅंड्सचं प्रतिनिधित्व करत आहे. 


भारतीय मार्केटिंग, जाहीरात आणि मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 'आयएए' लीडरशीप पुरस्काराने गौरवलं जातं. त्यानुसार रणवीरला 'ब्रँड एंडॉर्सर ऑफ द इयर' (Brand Endorser of the Year) या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये यंदाचा आयएए पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांसह बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंहची विशेष उपस्थिती होती.


आयएए पुरस्कार सोहळ्यात रणवीरला 'ब्रँड एंडॉर्सर ऑफ द इयर' या पुरस्कारानं सन्मानित केल्यानंतर रणवीरने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. दरम्यान रणवीरने न्यूड फोटोशूटवर पहिली प्रतिक्रिया दिली. रणवीर म्हणाला,"मी जसा आहे तसंच वागतो".


न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल


न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केल्याने तसेच महिलांच्या भावना दुखावल्याने एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


रणवीर सिंहचा आगामी सिनेमा


रणवीर सिंहचा आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणवीरसोबत आलिया भट्टदेखील दिसणार आहे. आलिया आणि रणवीरशिवाय या सिनेमात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील दिसणार आहेत.  


संबंधित बातम्या


Ranveer Singh On Nude Photoshoot : "मी जसा आहे तसंच वागतो"; न्यूड फोटोशूटवर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया


Ranveer Singh Police Complaint : न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; भावना दुखावल्याचा आरोप