Saba Azad Trolled: 'दारु जास्त झाली का?'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Saba Azad Trolled: एका इव्हेंटमध्ये सबानं हजेरी लावली. या कार्यक्रमातील सबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इव्हेंटमधील सबाच्या एका व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी सबाला ट्रोल केलं आहे.
Saba Azad Trolled: अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) (Hrithik Roshan) गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) ही नेहमीच चर्चेत असते. हृतिक आणि सबा हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये सबानं हजेरी लावली. या कार्यक्रमातील सबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इव्हेंटमधील सबाच्या एका व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी सबाला ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
सबा आझादने नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक केला. गोल्डन कलरचा आऊटफिट आणि मोकळे केस अशा लूकमध्ये सबानं इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील सबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये ती रॅम्प वॉक करताना आणि गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी सबाला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दारु जास्त झाली का?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'हिला नेमकं काय होतंय?'
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
हृतिक रोशननं सुझान खानसोबत 200 मध्ये लग्नगाठ बांधली त्यानंतर 2014 मध्ये हृतिक आणि सुझान हे विभक्त झाले. गेल्या काही दिवसांपासूनहृतिक हा सबाला डेट करत आहे तर सध्या सुझान ही अरसलान गोनीला डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
हृतिक आणि सुझान यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी ह्रतिकचा फॅमिली फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सबा देखील दिसत होती. ह्रतिक रोशनच्या फॅमिलीसोबत संडे लंच करण्यसाठी सबा त्याच्या घरी गेली होती. राजेश रोशननं हा फॅमिली फोटो शेअर केला होता. हृतिक आणि सुझान हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: