Honsla Rakh On OTT : दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh), शहनाज गिल (Shenaaz Gill) आणि सोनम बाजवा (Sonam Bajwa) 'हौसला रख' सिनेमाला सिनेमामृहात प्रचंड यश मिळाले होते. त्यानंतर हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होत आहे. हा एक रोमॅंटिक विनोदी सिनेमा आहे. 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमात एका वडिलांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. दिलजीत दोसांझ सिनेमात वडिलांची भूमिका साकारतो आहे. 

Continues below advertisement


दिग्दर्शक अमरजीत सिंग सरोन यांनी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आपला चित्रपट प्रदर्शित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आनंद व्यक्त करताना ते म्हणाले,"एक चित्रपट निर्माता म्हणून, तुमची कथा जगभरातील प्रेक्षकांशी जोडली जाईल याहून अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकते. 'हौसला राख' सिनेमाची कथा भावनिक आहे. सिनेमाला आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे". 
दरम्यान दिलजीत म्हणाला,"सिनेमाची कथा मानवी भावनांना स्पर्श करते. मला आनंद आहे की, जगभरातील प्रेक्षक आता या सिनेमासोबत जोडले जातील".


 


'हौसला रख' या सिनेमात दिलजीत दोसाज, शहनाज गिल आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात शहनाज गिल आईच्या भूमिकेत आहे. सिनेमाची कथा अधिक रंजक पद्धतीने रंगवली आहे. सिनेमा विनोदी असल्याने प्रेक्षकांना अधिक भावतो. 


संबंधित बातम्या


Jersey Movie : 'जर्सी'ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिदला अश्रू अनावर; भावूक करणारा अनुभव


Antim : सलामान खान, आयुष शर्मा आणि महेश मांजरेकर 'अंतिम'च्या प्रमोशनसाठी पुण्याला रवाना


Happy Birthday Prince Narula : नोरा, युविका अन् चार्ली; 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं प्रिंसचं नाव


'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीप-गौरीचं पुन्हा शुभमंगल सावधान; प्री-वेडिंगचा भन्नाट रेट्रो लूक


करीनासोबत लग्न करण्याआधी सैफनं लिहिलं अमृताला पत्र; शोमध्ये केला होता गौप्यस्फोट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha