Prince Narula Birthday Special : एमटीव्ही रोडीज आणि बिग-बॉस-9 (bigg boss 9) या शोचा विजेता ठरलेला प्रसिद्ध कलाकार प्रिंस नरूलाचा (Prince Narula ) आज 31 वा वाढदिवस. प्रिंसचा जन्म 24 नोव्हेंबर 1990 रोजी चंदीगढमध्ये झाला, मिस्टर पंजाब या स्पर्धेचा विजेता ठरलेल्या प्रिंसने छोट्या पडद्यावर त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमधील अभिनेत्रींसोबत प्रिंसचं नावं जोडलं गेलं होत. जाणून घेऊयात प्रिंससोबत कोणत्या अभिनेत्रींची नावं जोडण्यात आली होती.    


चार्ली चौहान 
रोडिज या शोमध्ये प्रिंसची मैत्री चार्ली चौहानसोबत झाली. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. प्रिंस आणि चार्लीच्या अफेरबद्दल त्यावेळी चर्चा सुरू होत्या.  


अनुकी


रोडिज हा शो जिंकल्यानंतर प्रिंसने स्प्लिस्टव्हिला या शोमध्ये सहभाग घेतला. या शोमध्ये अनुकीसोबत प्रिंसची मैत्री झाली. अनुकी आणि प्रिंसच्या अफेरची चर्चा त्यावेळी सुरू होती.


युविका चौधरी 
 बिग बॉस शोमध्ये प्रिंसची ओळख युविकासोबत झाली. या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 12 ऑक्टोबर 2018 मध्ये युविका आणि प्रिंसने लग्नगाठ बांधली. 






नोरा फतेही
'बिग बॉस सिझन-9' मध्ये युविका आणि प्रिंसची मैत्री झाली. पण युविका बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर प्रिंस बराच वेळ नोरासोबत घालवत होता. त्यामुळे नोरासोबत त्याचे नाव जोडण्यात आले होते. 


Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'


Happy Birthday Prince Narula : प्रिंसने सांगितलं फिटनेसचं रहस्य, जिम करून वाढवलं वजन