Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta)  या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत जयदीप आणि गौरी यांचा विवाहसोहळा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा जयदीप आणि गौरी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार आहेत. शिर्केपाटील कुटुंबात एखादा सणसमारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्न देखील अगदी थाटात पार पडणार आहे. प्री-वेडिंग फोटोशूट, मेहंदी, हळद, वरात आणि लग्न हे सर्व समारंभ साजरे करण्यात येणार आहेत.
 
प्री-वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाने रेट्रो लूक केला आहे. जयदीप काशिनाथ घाणेकर आणि गौरी आशा काळे यांच्या लूकमध्ये  दिसणार आहेत. तर उदय आणि देवकी दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या लूकमध्ये दिसतील. शेखरने अभिनेता अशोक सराफ आणि रेणुकाने अभिनेत्री रंजना यांचा लूक प्री-वेडिंग फोटोशूटसाठी केलाय. तर मल्हारने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे लूक केला. माई आणि दादा हे सुद्धा 70च्या दशकातल्या कलाकरांच्या लूकमध्ये दिसणार आहेत. तर अम्मा दिसणार आहे अभिनेत्री ललिता पवार यांच्या लूकमध्ये. संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या प्री-वेडिंग फोटोशूटच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहेत.


करीनासोबत लग्न करण्याआधी सैफनं लिहिलं अमृताला पत्र; शोमध्ये केला होता गौप्यस्फोट


खरतर खूप काळानंतर आणि खूप संघर्षानंतर शिर्केपाटील कुटुंब आनंदात आहे. त्यांच्या या आनंदात प्रेक्षकांनी देखील सहभागी व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, मीनाक्षी राठोड, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कालकार प्रमुख भूमिका साकरतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. 


Jersey Movie : 'जर्सी'ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिदला अश्रू अनावर; भावूक करणारा अनुभव


Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'