मुंबई : टेलिव्हिजन विश्व गाजवल्यानंतर अभिनेत्री हिना खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'हॅक्ड' (Hacked) या चित्रपटातून हिना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाची कथा फार वेगळी आहे. ट्रेलरबाबत बोलायचे झाले तर त्यामध्ये ड्रामा, रोमान्स आणि सस्पेंसची जबरदस्त मेजवाणी पाहायला मिळणार आहे.


'हॅक्ड' (Hacked) या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलायचं झालं तर हे कथानक एका हॅकरच्या आजूबाजूला फिरताना दिसतं. ट्रेलरमध्ये अभिनेता रोहन शाह, जो याचित्रपटात 19 वर्षांच्या एका हॅकरची भूमिका साकारत आहे. तो हिना खानवर जीवापाड प्रेम करत असतो. परंतु, जेव्हा हिना त्याच्या वयाचं कारण सांगून त्याच्यापासून दूर जाते. तेव्हा तो बदला घेण्यासाठी अनेक गोष्टी करतो.





चित्रपटात अभिनेता रोहन हॅकिंग एक्सपर्ट असतो. त्याच्या याच टॅलेंटचा वापर तो, हिना खानवर दबाव आणण्यासाठी करतो. रोहनची भूमिका एखाद्या मनोरूग्णाप्रमाणे चित्रपटात दाखवण्यात आली आहे. तो आपलं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार होतो.


ट्रेलरमध्ये हिना खान अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे. दरम्यान, हिना खानचा अभिनय अनेक सीन्समध्ये कमकुवत दिसून येत आहे. रोहन शाह यूट्यूबच्या अनेक वेब सीरीजमधून दिसून आला आहे. याव्यतिरिक्त सीरियल्स आणि अनेक जाहिरातींमध्येही दिसून आला आहे. ट्रेलरच्या शेवटी हिना खान एक छोटासा मेसेजही देते.



दरम्यान, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की' मध्ये हिनाने कोमोलिकाची भूमिका साकारली होती. हिनाने कोमोलिका बनून सर्वांची मन जिंकली होती. जुन्या कोमोलिकाला विसरायला हिनाने प्रेक्षकांना भाग पाडलं. पण त्यानंतर हिनाने मालिका सोडली. तिच्या या निर्णयानंतर चाहते नाराज झाले होते. पंरतु,सिनेमात डेब्यू करण्यासाठी तिने मालिका सोडत असल्याचं सांगितलं असतं. तसेच हिना सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असून ती आपले क्लासी आणि बोल्ड फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या क्लासी अदांमुळे हिना अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.


संबंधित बातम्या : 


दिशा पटानी ट्विटरवर सर्वाधिक प्रसिद्ध; दीपिका, प्रियंकालाही टाकलं मागे


लाल साडीमध्ये खुलून दिसतेय जान्हवी; चाहते म्हणाले, 'सेम टू सेम श्रीदेवी'!


तुकडे-तुकडे गँगचं समर्थन करणार नाही, कंगनाचा दीपिकाला टोला


कपिल शर्माने चाहत्यांसोबत शेअर केला आपल्या लाडक्या लेकीचा फोटो