मुबंई : टीव्ही जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांना मुलगी झाली आहे. कपिल शर्माने पहिल्यांदाचा आपल्या लाडक्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. सोशल मीडियावर कपिल शर्माचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.


कपिलने आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. 'भेटा माझ्या काळजाच्या तुकड्याला अनायरा शर्मा ' असे म्हणत हा फोटो पोस्ट केला आहे. कपिलने आपल्या मुलीचे नाव अनायरा ठेवले आहे. कपिलने केलेल्या ट्वीटनंतर अनेक फॅन्सनी ट्वीट करत त्याला शुभेच्छा दिल्या.



दरम्यान, कपिल आणि गिन्नी यांचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. काही दिवसांपूर्वी कपिल आपली पत्नी गिन्नीला घेऊन बेबीमूनसाठी गेला होता. आपल्या पत्नीला वेळ देता यावा म्हणून मागील महिन्यात कपिलने आपल्या शोच्या आगामी एपिसोड्सचंही शुटिंग आधीच केलं होतं.