एक्स्प्लोर
इरफान खानच्या नव्या हॉलिवूड सिनेमाचं पोस्टर रिलीज
दरम्यान, एका दुर्धर आजाराशी लढत असलेला इरफान गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये उपचार घेत आहे. आता चाहत्यांना त्याच्या कमबॅकची प्रतीक्षा आहे.
मुंबई : 'हिंदी मीडियम' आणि 'करीब करीब सिंगल'च्या यशानंतर इरफान आता 'पझल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या हॉलिवूड चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. इरफानने याही आधी अनेक हॉलिवूड चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
'पझल'चा ट्रेलर याआधीच रिलीज करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमात इरफान स्कॉटिश अभिनेत्री केली मॅक्डोनाल्डसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
चित्रपटाचे कथानक सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत असणाऱ्या मॅक्डोनाल्डभोवती फिरते. जी आपल्या रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्येतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. अशातच इरफान खान साकारत असलेल्या पात्राबरोबर तिची ओळख होते. हा चित्रपट 13 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
पझलशिवाय इरफानचा 'कारवां' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने त्याचं पोस्टर आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केलं होतं.
दरम्यान, एका दुर्धर आजाराशी लढत असलेला इरफान गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये उपचार घेत आहे. आता चाहत्यांना त्याच्या कमबॅकची प्रतीक्षा आहे.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement