Hema Malini Sang Bhajan Janamashtmi 2023 : लोकप्रिय अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) सध्या चर्चेत आहेत. गोकुळाष्टमीनिमित्त (Janmashtami 2023) त्यांनी 'झुला झूले राधा रानी' (Jhoola Jhoole Radha Rani) हे खास भजन गायलं आहे. मुंबईतील इस्कॉन समागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी भजन गायलं आहे.


'झुला झूले राधा रानी' हे भजन भजनरत्न नारायण अग्रवाल (दास नारायण) यांनी लिहिलं आहे. तर या भजनाला विवेक प्रकाश यांनी संगीत दिले आहे. हेमा मालिनी 'झुला झूले राधा रानी' हे भजन गाताना नारायण अग्रवाल, विवेक प्रकाश, इस्कॉनचे प्रमुख सूरतदास प्रभुजी आणि लोकप्रिय संगीतकार अनू मलिकदेखील मंचावर उपस्थित होते.


हेमा मालिनी यांनी कृष्णभक्त अनु मलिक यांना खास आमंत्रित केले होते. अनु मलिक म्हणाले,"माझ्या करिअरच्या यशात हेमा मालिनी यांचा मोलाचा वाटा आहे. संगीतकार म्हणून त्यांनी मला संधी दिली आहे. माझ्या कारकिर्दी वाढीत त्यांनी मदत केली आहे. कोणत्याही परिस्थितीत त्या नेहमीच सोबत होत्या". 


गायिका नसूनही मला संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट : हेमा मालिनी


'झुला झूले राधा रानी' हे भजन गाण्याबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या,"एक अभिनेत्री असूनही मला गोकुळाष्टमीनिमित्त झुला झूले राधा रानी' हे भजन गाण्याची संधी दिल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. गेल्या चार-पाच वर्षांपासून मी भजन गात आहे. गायिका नसूनही मला संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे". 


एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी 'झुला झूले राधा रानी' हे भजन गातानाचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या,"झुला झूले राधा रानी' हे भजन गाणं अवघड होतं पण मी एक आव्हान म्हणून ही गोष्ट स्वीकारली आणि गायलं". हेमा मालिनी गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर दरवर्षी मुंबईच्या इस्कॉन सभागृहात कृष्णाशी संबंधिक एक खास नृत्यनाटिका सादर करतात. 


हेमा मालिनी यांनी चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच फक्त ब्रिजवासी मंदिरात न जाता वेगवेगळ्या मंदिरात जाऊन गोकुळाष्टमी साजरी करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


'ड्रीम गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. हेमा मालिनी या मनोरंजनसृष्टीसह राजकारणातही सक्रीय आहेत. हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग असून त्यांची क्रेझ कायम आहे.


">


संबंधित बातम्या


 


Hema Malini : एक अकेला मोदी है सब पे भारी, अब नहीं आएगी किसी की बारी : हेमा मालिनी