Hema Malini : 'सोसायटी अचिव्हर्स' या मासिकाच्या अनावरण सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), योगी आणि त्यांच्या मथुरेबद्दल भाष्य केलं. दरम्यान मोदी एकटेच सर्वांना भारी, आता कोणाचीही पाळी येणार नाही, असं वक्तव्य हेमा मालिनी यांनी केलं. 


हेमा मालिनी म्हणाल्या,"एक अकेला मोदी है सब पे भारी, अब नहीं आएगी किसी की बारी. विरोधक नेहमीच मोदींवर विनाकारण निशाणा साधत आले आहेत. दुसरीकडे मोदी नेहमीच देशहिताचा आणि जनतेच्या हिताचा विचार करतात". तसेच हेमा मालिनी यांनी मथुरेत वेगाने होत असलेल्या विकासकामांची तपशीलवार माहितीदेखील दिली.


हेमा मालिनी पुढे म्हणाल्या,"आधी मला स्वतःला खात्री नव्हती की मी खासदार म्हणून काय करेल, पण नंतर कामाचा अंदाज येऊ लागल्यानंतर मी मथुरेत खूप बदल घडवून आणले आहेत. मी खासदार होण्याआधी मथुराची स्थिती अतिशय वाईट होती. पण आता या शहराला नवसंजीवनी दिली आणि अनेक सांस्कृतिक केंद्रे उघडली आणि मथुराचा सर्वतोपरी विकास केला".


बॉलिवूड इंडस्ट्रीच्या ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) आणि भाजपच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मालिनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अमुल्य योगदान दिले आहे. बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी यांची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. रुपेरी पडद्यासोबतच त्या राजकारणी म्हणूनही खूप सक्रिय आहेत.


'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1961मध्ये आलेल्या तेलुगु चित्रपट 'तपंडव वनवासन'मध्ये हेमा मालिनी यांनी एका नर्तिकेची भूमिका साकारली होती. आजघडीला हेमा मालिनी केवळ हिंदी चित्रपटांच्या अभिनेत्री म्हणूनच नाही तर, एक राजकारणी म्हणून देखील ओळखल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.


ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा चित्रपट ते राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. अभिनेत्री हेमा मालिनी या सध्या चित्रपटांपासून दूर असून, राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. 2004मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये हेमा मालिनी मथुरेच्या लोकसभेवर निवडून आल्या होत्या. हेमा मालिनी यांना कधीच राजकारणात यायचे नव्हते. विनोद खन्ना यांनी हेमा मालिनी यांना राजकारणाचा मार्ग दाखवला. स्वतः हेमा मालिनी यांनी याची कबुली दिली होती.


संबंधित बातम्या 


Rahul Gandhi Flying Kiss : 'फ्लाईंग किस' देताना मी राहुल गांधी यांना पाहिलं नाही : Hema Malini