Hema Malini at Ram Mandir Ayodhya :  बॉलीवूडच्या (Bollywood) दिग्गज अभिनेत्या हेमा मालिनी (Hema Malini) यांनी नुकतच अयोध्येत जाऊन रामाचे (Ram Mandir) दर्शन घेतले आहे. अयोध्येतील (Ayodhya) फोटो हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. तसेच त्यांनी मंदिरात पूजा देखील केली. यावेळी हेमा मालिनी यांनी फोटो शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


हेमा मालिनी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बातचीत करताना म्हटलं की, येथील सर्व व्यवस्था उत्तम आहे. .मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी हेमा मालिनी देखील उपस्थित होत्या. पण आता त्यांनी मंदिरात जाऊन सहकुटुंब रामाचे दर्शन घेतले. 


हेमा मालिनी यांनी फोटो केले शेअर


हेमा मालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचे अयोध्येतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन देखील दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'अयोध्येत आता कुटुंबासोबत आणि राम लल्लाच्या दिव्य दर्शनाचा आनंद घेत आहे. मी राम लल्लासाठी मंदिरात माझी राग सेवा (नृत्याचा प्रकार) करणार असल्याने खरोखरच धन्य वाटत आहे. अनेक नामवंत कलाकारांनी याआधीही येथे परफॉर्म केले आहेत आणि अजून बरेच जण रांगेत उभे आहेत.' 


ईशा देओलच्या घटस्फोटानंतर हेमा मालिनी पहिल्यांच माध्यमांसमोर


नुकतच हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. त्यानंतर सर्वत्र देओल कुटुंबियांची चर्चा सुरु होती. दरम्यान यासगळ्यानंतर हेमा मालिनी या पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्यात. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला देखील हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता हेमा मालिनी यांनी राम मंदिराचे दर्शन घेतले आहे. 


 






ही बातमी वाचा : 


Allu Arjun : अल्लू अर्जुनचा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जलवा; पुष्पाच्या स्टायलिश एन्ट्री समोर सर्वकाही फेल