Pushpa Star Allu Arjun in Berlin Film Festival : दाक्षिणात्य सुपस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या 'पुष्पा : द राईज' (Pushpa The Rise) या सिनेमाच्या खास स्क्रीनिंगसाठी बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला आहे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील रेड कार्पेटवरील त्याच्या स्टायलिश एन्ट्रीने सर्वांनाच थक्क केलं. 


बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अल्लू अर्जुनची धमाकेदार एन्ट्री


बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अल्लू अर्जुनने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. जागतिक पातळीवर त्याने पुन्हा एकदा भारताचं नाव उंचावलं आहे. रुस, अमेरिका, गल्फ, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये अल्लू अर्जुनच्या सिनेमाचं प्रचंड कौतुक होत आहे. 'पुष्पा : द राइज'च्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या स्क्रीनिंगमुळे या सिनेमाच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.


'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)


'पुष्पा' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली. आता 'पुष्पा 2'चा ट्रेलर आऊट झाल्याने प्रेक्षकांना या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


'पुष्पा: द राइज' ला मिळाली प्रेक्षकांची पसंती 


पुष्पा-2 म्हणजेच 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाआधी 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदान्ना ,फहद फासिल आणि अनसूया भारद्वाज यांनी काम केलं. या चित्रपटांमधील गाणी देखील सुपरहिट ठरली. या चित्रपटामधील ओ अंटावा या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता प्रेक्षक 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3'ला टक्कर देणार असे म्हटले जात आहे.


तगडी स्टारकास्ट असणारा 'पुष्पा 2' (Pushpa 2 Starcast)


'पुष्पा 2' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अभिनेता फहद फासिलदेखील या सिनेमाचा भाग असणार आहे. सुकुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.


संबंधित बातम्या


Pushpa 2: 'पुष्पा 2' च्या सेटवरील फोटो लीक; अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं लक्ष