मुंबई : अभिनेता साहील खानला हायकोर्टानं मोठा दिलासा देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. याप्रकरणी प्रथमदर्शनी साहिलनं मनोज पाटील याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं दिसत नाही, असं स्पष्ट मत न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी हा अटकपूर्व जामीन देताना मंजूर केलं आहे. साहिलला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करत त्याला याप्रकरणी पोलीस तपासांत सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 


मुंबईतील एक उदयोन्मुख बॉडीबिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा साहिल खानवर आरोप आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी ओशिवरा पोलीस स्थानकांत यासंबंधित गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटक टळण्यासाठी साहिलनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


पिळदार शरीरयष्टीचा 'स्टाईल' या सिनेमातला हिरो साहिल खान सर्वांनाच माहित आहे. मात्र बॉलिवूडनंतर हल्ली साहिल खान सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो. मनोज आणि साहिलमधला वाद हा बॉडिबिल्डिंगशी संबंधित ब्रँड वॉरचा एक भाग आहे. या क्षेत्रात असंख्य ब्रँड्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रसंगी हे ब्रँड विविध सस्थांशी जोडले जातात. आणि मग सुरू होते जीवघेणी स्पर्धा, तुझी संस्था मोठी की माझी?, तुझा ब्रँड मोठा की माझा? मनोज आणि साहिलमध्ये याच कारणांवर सोशल मीडियावर बरीच शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर साहिलच्या समर्थकांकडून सुरू झालेली ट्रोलिंग असहाय्य झाल्यानं त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मनोजचे कुटुंबिय आणि त्याच्या मित्रांनी केला होता. साहिल खाननं मात्र हे सारे आरोप फेटाळून लावत आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 


संबंधित बातम्या


अभिनेता साहिल खानला हायकोर्टाचा दिलासा; साहील आणि आएशा श्रॉफ यांनी वाद सामंजस्यानं मिटवला


भाजपनेते आशिष शेलार यांच्या अडचणी वाढणार? BMC महापौरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार


वानखेडेंवर पुन्हा टीका केल्याने मलिकांना कोर्टाने सुनावले, शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha