Pushpa: The Rise : तेलगू स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) च्या 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जंगलातील मूळ रहिवासींचा गुंतागुंतीचा संघर्ष उलगडण्यात आला आहे. ट्रेलर अॅक्शन, हिंसा, दमदार संवाद आणि रोमान्सने भरलेला आहे.


 


'पुष्पा: द राइज' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शनची झलक पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये सिनेमातील मुख्य पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. अल्लू अर्जुन या सिनेमात चंदन तस्करची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये चंदन तस्कर या पात्राची ओळख करून देताना अ‍ॅक्शन सीक्वेन्स आणि डान्सचा वापर करण्यात आला आहे. तर इतर पात्रांची ओळख छोट्या छोट्या झलकांमध्ये केली आहे.






रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, अनुसया भारद्वाज, अजय गोश आणि इतर कलाकारांच्या या सिनेमात महत्तवाच्या भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तर निर्मिती रविशंकर यांनी केली आहे. थरार नाट्य असलेला हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. मल्याळम, तमिळ, हिंदी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


'रश्मिका'च्या पात्रावर आधारित गाणे
'श्रीवल्ली' गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात रश्मिका कोणती भूमिका साकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातील हे दुसरे गाणे 'रश्मिका'च्या पात्रावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे. चित्रपटातील या गाण्याचे अनेक प्रेमळ पदर आहेत. तसेच या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे पाच भाषांत बनवलेले आहे. 2021 सालातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय होणार आहे.


संबंधित बातम्या


Sara Tendulkar : सचिनच्या मुलीची मॉडलिंग क्षेत्रात एन्ट्री; शेअर केला जाहिरातीचा व्हिडीओ


Ankita Lokhande and Vicky Jain wedding : अंकिता आणि विकीच्या लग्नाचं राज्यपालांना आमंत्रण; सोशल मीडियावर फोटो व्हायरल