Jersey Poster Release : शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी' सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) सोशल मीडियावर त्याच्या आगामी 'जर्सी' (Jersey) सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे.  शाहिद कपूरच्या 'जर्सी' सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. 'जर्सी' सिनेमा येत्या 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 







शाहिद कपूरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'जर्सी' सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. सिनेमाचे पोस्टर शेअर करत शाहिदने लिहिले आहे,"हे मला प्रत्येकवेळी हसायला भाग पाडते. 'मैय्या मैनु' सिनेमातील दुसरे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे. तर जर्सी सिनेमा 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे".





'जर्सी' हा टॉलिवूड सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. सिनेमात पंकज कपूरसोबत मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.


संबंधित बातम्या


Jersey Trailer : Shahid Kapoor च्या 'जर्सी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित


Pushpa Trailer Out : अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाच्या 'Pushpa: The Rise' सिनेमाचा ट्रेलर आऊट, थरार नाट्य असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha