एक्स्प्लोर
मिर्झिया.... तीन गायकांच्या आवाजातील टायटल साँग रिलीज
मुंबई : दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. रंग दे बसंती, भाग मिल्खा भाग आणि दिल्ली 6 यांसारखे सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या राकेश मेहरा आता मिर्झिया-साहिबा यांची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत.
या सिनेमाचं टायटल साँग रिलीज झालं असून, ते तीन गायकांनी गायलं आहे. दलेर मेहंदी, शंकर महादेवन आणि सैन जहूर यांचा आवाज या गाण्याला आहे.
अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन, संयमी खेर आणि अनुज चौधरी यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी ‘मिर्झिया’ रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेते ओम पुरीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
सिनेमाच्या ट्रेलरला सिनेरसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता टायटल साँग रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमातून हर्षवर्धन आणि संयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement