एक्स्प्लोर

Harsh Wardhan Reply To Trolls: डेव्हिड बॅकहमसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनिल कपूर यांच्या लेकाला नेटकऱ्यानं केलं ट्रोल; हर्षवर्धन सडेतोड उत्तर देत म्हणाला, "भावा तो..."

Harsh Wardhan Reply To Trolls:  डेव्हिड बॅकहमसोबतचा फोटो हर्षवर्धननं सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर केल्यानंतर एका नेटकऱ्यानं हर्षवर्धनला ट्रोल केलं.

Harsh Wardhan Reply To Trolls:  वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) च्या सेमीफायनल मॅचमध्ये फुटबॉलर डेव्हिड बॅकहमनं (David Beckham) हजेरी लावली होती. या मॅचनंतर  सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये डेव्हिड बॅकहमनं हजेरी लावली. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. सोनम कपूरचा भाऊ आणि अनिल कपूरचा मुलगा अभिनेता  हर्षवर्धन कपूर (Harsh Wardhan) देखील या दिवळी पार्टीमध्ये उपस्थित होता. या पार्टीमधील डेव्हिड बॅकहमसोबतचा फोटो हर्षवर्धननं सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर केल्यानंतर एका नेटकऱ्यानं हर्षवर्धनला ट्रोल केलं. या ट्रोलरला आता हर्षवर्धननं सडेतोड उत्तर दिलं आहे.

नेटकऱ्यानं  केलं ट्रोल

हर्षवर्धन कपूरनं शेअर केलेल्या डेव्हिड बॅकहमसोबतच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तू कोण आहेस? असं त्याने विचारलं नाही का?' नेटकऱ्याच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. त्यानंतर हर्षवर्धन कपूरनं नेटकऱ्याच्या कमेंटला सडेतोड उत्तर दिलं.

हर्षवर्धननं दिलं सडेतोड उत्तर

"भावा, तो माझ्या घरी आला होता. पण तू कोण आहेस?" असा रिप्लाय हर्षवर्धन कपूरनं नेटकऱ्याच्या कमेंटला दिला. 

'या' कलाकारांनी दिवाळी पार्टीमध्ये लावली हजेरी

डेव्हिड बॅकहमसोबतच शाहिद कपूर, फरहान अख्तर, करिश्मा कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी देखील सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली होती. या दिवाळी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harsh Varrdhan Kapoor (@harshvarrdhankapoor)

हर्षवर्धनचे आगामी चित्रपट

थार,मिर्झा, भावेश जोशी सुपहिरो, रे या चित्रपटांमध्ये हर्षवर्धननं काम केलं आहे. हर्षवर्धन हा लवकरच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हर्षवर्धनच्या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या:

World Cup 2023: 'प्लिज वर्ल्ड कपची मॅच बघायला जाऊ नका'; नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना का केली विनंती? 'हे' आहे कारण

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget