एक्स्प्लोर

Leslie Phillips: हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन; वयाच्या 98 व्या घेतला अखेरचा श्वास

लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) यांनी वयाच्या तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला (Sorting Hat) लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता.

Leslie Phillips: ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) यांचे निधन झाले आहे. 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  कॅरी ऑन या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेची प्रेक्षकांना पसंती मिळाली. तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला (Sorting Hat) लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनानं हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 

200 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम

ज्येष्ठ अभिनेते लेस्ली फिलिप्स यांच्या मृत्यूची माहिती एजंट जोनाथन लॉयड यांनी दिली. त्यांनी सांगितलं की,  लेस्ली फिलिप्स यांनी झोपेत असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन स्ट्रोक आले होते. लेस्ली फिलिप्स यांनी 80 वर्षांपेक्षा जास्त काळातील त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच त्यांनी टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रम यांमध्ये काम केलं आहे. 

लेस्ली फिलिप्स यांचा जन्म 20 एप्रिल 1924 रोजी लंडन येथे झाला. कॅरी ऑन सीरिजच्या यशानंतर, लेस्ली फिलिप्स यांनी 'डॉक्टर इन द हाऊस', टॉम्ब रेडर आणि मिडसमर मर्डर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. लेस्ली फिलिप्स यांच्या आयकॉनिक वन लाइनर्सला प्रेक्षकांची पसंती मिळत होती.

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 2006 च्या व्हीनस चित्रपटात पीटर ओ टोल सोबतच्या त्यांच्या सहाय्यक कामगिरीबद्दल त्याला बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिलिप्स यांनी स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'एम्पायर ऑफ द सन' आणि सिडनी पोपच्या 'आउट ऑफ आफ्रिका' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला. 2012  मध्ये रिलीज झालेला आफ्टर डेथ हा लेस्ली फिलिप्स यांचा शेवटचा चित्रपट होता.

लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने अभिनेत्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या पतीच्या निधनाबद्दल एका मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या,'लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले. तो कुठेही गेला तरी लोकांनी त्याला अपार प्रेम दिले.'

गेल्या महिन्यात हॅरी पॉटर हॅग्रिडची (Hagrid) भूमिका साकारणारे प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 9 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget