एक्स्प्लोर

Natasa Stankovic : हार्दिक पांड्या आधी 'या' अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये होती नताशा; पाच वर्षांच्या नात्यात दोन वेळा ब्रेकअप

Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्यासोबत लग्न करण्याआधी नताशा एका अभिनेत्यासोबत पाच वर्ष रिलेशनमध्ये होती.

Natasa Stankovic Love Relations : भारताच्या अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांचा घटस्फोट झाला आहे. चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशा विभक्त झाले आहे. या दोघांनी सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचं सहा वर्षांचं नातं होतं. त्यांनी लग्नाआधी एकमेकांना दोन वर्ष डेट केलं होतं. या सहा वर्षांच्या नात्यावर आता पूर्णविराम लागलं आहे.

हार्दिक पांड्याआधी अभिनेत्यासोबत 5 वर्षं रिलेशनमध्ये होती नताशा

नताशा अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेलही आहे. नताशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. हार्दिक पांड्यासोबत लग्न करण्याआधी नताशा एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. नताशाने एका टीव्ही अभिनेत्याला पाच वर्ष डेट केलं होतं. त्यांच्या पाच वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये दोन वेळा ब्रेकअप झाला होता. हार्दिकआधी नताशा स्टॅनकोविक अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचं नातं पाच वर्ष टिकलं त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

नताशा स्टॅनकोविक आणि अली गोनी

हार्दिक पांड्या आणि नताशा आता विभक्त झाले आहेत. मात्र, नताशाच्या आयुष्यात ब्रेकअपचा हा पहिलाच अनुभव नाही. ती याआधी प्रेमात पडली होती आणि अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिचा ब्रेकअप झाला होता. या नात्याबद्दल ती कायमच बोलकी होती. तिने एका रिॲलिटी शोमध्येही त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. नताशा स्टॅनकोविच टीव्ही अभिनेता अली गोनीला डेट करत होती.

नताशा आणि अली गोनी यांची भेट

हार्दिक पांड्यापूर्वी नताशा अली गोनीसोबत पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. अली आणि नताशाची पहिली भेट अलीच्या वहिनीनेच करुन दिली होती. यानंतर त्यांची मैत्री वाढली आणि दोघेही प्रेमात पडले. 2014 मध्येच दोघे रिलेशनशिपमध्ये आले आणि त्यानंतर बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. दोघांमध्ये अनेक मतभेद होते, त्यामुळे ते अनेक वेळा वेगळे झाले पण, पुन्हा सोबत आले. पाच वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांचा दोन वेळा ब्रेकअप झाला होता. 

एका वर्षातच नातं संपलं

'नच बलिये 9'मध्ये हे कपलच्या झळकलं होतं. यावेळी दोघांनीही त्यांचं नातं मोकळेपणाने सर्वांसमोर मांडलं होतं. वर्षभरातच त्यांचा ब्रेकअप झाला होता, मात्र त्यानंतरही दोघेही पुन्हा एकत्र आले होते, असं दोघांनीही शोमध्ये सांगितलं होतं. त्यांच्या नात्यातील संभ्रमाबद्दल शोचे जज अहमद खान यांनी दोघांना विचारलं होतं की, "तुमचे ब्रेकअप होऊन 5 वर्षे झाली आहेत की पाच वर्षांनी तुम्हा दोघांचं ब्रेकअप झालं?" यावर उत्तर देताना अलीने सांगितलं होतं की, 'ब्रेकअप होऊन चार वर्षे झाली आहेत.'

अली गोनीने ब्रेकअपचं कारण सांगितलं

अली गोनीने ब्रेकअपबद्दल सांगताना म्हटलं की, आम्ही वेळोवेळी भेटत राहतो आणि त्यामुळे ब्रेकअप झाल्याचं विसरलो. नताशाने सांगितलं की, गेल्या 5 वर्षांत ते अनेकदा भांडले आणि वेगळे झाले, दोनदा ब्रेकअप झालं, तरीही ते एकमेकांना भेटत राहिले. प्रेम होतं, त्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे राहू शकले नाहीत. अलीने एका मुलाखतीत नताशासोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं होतं. यावेळी अली म्हणाला होता, 'वेगवेगळ्या संस्कृतींमुळे आम्हाला वेगळे व्हावे लागले आणि मला एका भारतीय मुलीसोबत राहायचं होतं'.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाला किती पोटगी मिळणार? संपत्तीतील मोठा वाटा देण्याचं मान्य केल्याची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget