Katrina Kaif Birthday : बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज (16 जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिना आजच्या काळातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना कैफने अनेक मोठ्या कलाकारांसोबत अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी कतरिना कैफ मॉडेलिंग करायची. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मॉडेलिंगच्या काळात तिला 2003 मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.
चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कतरिनाचे घेतले जाते. आपल्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण, हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात महागडी हिरोईन असलेल्या कतरिनाचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला होता.
वयाच्या 14व्या वर्षी जिंकली सौंदर्य स्पर्धा!
कतरिनाने लहानपणापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने हवाईमध्ये एक सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने अनेक फ्रीलान्स प्रोजेक्ट्सवर काम केले. कतरिना कैफ आज बॉलिवूडमध्ये जे यश मिळवते आहे, ते मिळवणे तिच्यासाठी फार सोपे नव्हते. सुरुवातीला कतरिना हिंदीदेखील बोलता येत नव्हते. पण, कतरिनाने मेहनतीच्या बळावर हे यश मिळवले. अभिनेता अक्षय कुमार ते सलमान खान अशा बड्या कलाकारांसोबत ती झळकली आहे.
पहिलाच चित्रपट ठरला होता फ्लॉप!
कतरिनाने 2003 मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, मधु सप्रे आणि पद्मा लक्ष्मी हे कलाकार देखील होते. या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफने केली होती. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. या चित्रपटामुळे झालेल्या नुकसानानंतर युनिटचे पैसे भरण्यासाठी निर्मात्याला आपले घरही विकावे लागले होते.
‘बूम’ चित्रपट फ्लॉप झाला. पण, या चित्रपटातील कतरिना कैफच्या बोल्ड स्टाईलने बरीच प्रसिद्धी मिळवली. 'बूम' आपटल्यानंतर कतरिनाने साऊथकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिने 'मल्लीस्वरी' या तेलगू चित्रपटात काम केले. यानंतर ती बॉलिवूड चित्रपट 'सरकार'मध्ये दिसली. या चित्रपटात कतरिना कैफची छोटी भूमिका होती. कतरिनाला अभिनेत्री म्हणून खरी ओळख सलमान खानच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटातून मिळाली.
यानंतर कतरिनाने 'नमस्ते लंडन', 'सिंग इज किंग', 'पार्टनर', 'अजब प्रेम की गज़ब कहानी', 'एक था टायगर', 'जब तक है जान', 'टायगर जिंदा' असे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आता कतरिना कैफची गणना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.
हेही वाचा :
Katrina Kaif ,Vicky Kaushal Photos : विकी कतरिना स्पेंड करतायत 'क्वालिटी टाईम'; शेअर केले खास फोटो
katrina kaif, Vicky Kaushal : कतरिनाचा एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, 'प्रेग्नंट आहेस का?'