Koffee With Karan 7 : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण 7' च्या (Koffee With Karan 7) दुसऱ्या एपिसोडमध्ये एकत्र हजेरी लावली होती. सारा आणि जान्हवी दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींची मैत्री नेहमी पाहायला मिळते. या शोमध्ये सारा आणि जान्हवीने करण जोहरसमोर अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या डेटिंगच्या चर्चांबद्दल खुलासा केला आहे. एकेकाळी सारा आणि जान्हवी एकाच घरातील दोन भावांना डेट करत असल्याचं गुपित या शोमध्ये उलगडलं आहे.


जान्हवी आणि सारा या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि या दोघी अनेकदा एकत्र ट्रिपला देखील जात असतात. आता करणच्या या शोमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक खुलासे केले. त्याचवेळी करण जोहरनेही एक खुलासा केला, जो ऐकून सर्व चाहते थक्क झाले आहेत. या शोमध्ये करणने सांगितले की, दोन्ही अभिनेत्रींनी एकाच घरातील दोन भावांना डेट केले आहे. करण या शोमध्ये म्हणाला की, 'कोरोना काळानंतर आता तुमची मैत्री कोणत्या स्तरावर आहे हे मला माहीत नाही. पण, एकेकाळी तुम्ही दोघींनी 2 भावांना डेट केले होते. ती दोन मुलं माझ्याच बिल्डींगमध्ये राहायची.’


दोन भावांना डेट करत होत्या सारा आणि जान्हवी


मीडिया रिपोर्टनुसार एकेकाळी सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी पहाडिया बंधू वीर आणि शिखर पहाडिया यांना डेट केले होते. पहाडिया कुटुंबाचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध आहे. वीर पहाडिया 28 वर्षांचा असून, तो दुबईला शिक्षणासाठी गेला आहे. शिखर 23 वर्षांचा असून तो सध्या लंडनमध्ये शिकत आहे. दोन्ही भावांची एक मनोरंजन आणि गेमिंग कंपनी आहे, जी त्यांनी 2018 मध्ये सुरू केली होती.


विजय देवरकोंडाला करायचंय डेट!


या शोमध्ये करण जोहरने साराला विचारले की, तिचा क्रश कोण आहे आणि तिला आता कोणाला डेट करायला आवडेल? यावर सारा अली खानने साऊथचा लोकप्रिय स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचे नाव घेतले. साराच्या या उत्तराने करण जोहर आणि जान्हवी कपूरही हैराण झाले होते.


हेही वाचा: