Haddi Twitter Review: नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी ओटीटीवर झाला रिलीज; चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...
Haddi Twitter Review: काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हड्डी चित्रपटामधील नवाजुद्दीनच्या भूमिकेचं कौतुक केले आहे.
Haddi Twitter Review: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin Siddiqui)हड्डी हा ओटीटीवर चित्रपट रिलीज झाला आहे. अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन हड्डी चित्रपटामधील नवाजुद्दीनच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांनी 'हड्डी' चं केलं कौतुक
एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'हड्डी, अत्याचार आणि हिंसाचारात जन्मलेला आणि वाढलेल्या हड्डीची गोष्ट . नवाजुद्दीन सिद्दीकीने हड्डी या ट्रान्सजेंडरची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारली आहे. चित्रपटात हड्डी हा बदला घेण्याचा प्रयत्ना करत आहे.'
Haddi,
— Avinash dixit (@Pndat768) September 7, 2023
Born and raised amidst abuse and violence, Haddi has survived it all. Watch Nawazuddin Siddiqui's powerful portrayal of Haddi, a transgender, who is on a quest for revenge. #Haddi #NawazuddinSiddiqui #AnuragKashyap #MohammadZeeshanAyyub #ShahRuhKhan pic.twitter.com/OgFasLXKbY
'नवाजुद्दीननं हड्डी चित्रपटामध्ये खूप चांगलं काम केलं आहे. हड्डी चित्रपटामध्ये नवाजुद्दीनची आतापर्यंतची सर्वात खतरनाक भूमिका बघायला मिळते. जिने गँग्स ऑफ वासेपूर आणि सेक्रेड गेम्सलाही मागे टाकले आहे. हड्डी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन.' असंही एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
What a jaw-dropping performance by @Nawazuddin_S in #Haddi premiering on @ZEE5India .
— PRASHUN MISHRA (@prashun_mishra) September 6, 2023
Most ruthless role played by now,even surpassed GangsOfWasseypur and SacredGames .
Kudos to whole team of #Haddi .
Aur sun "Marti_nahi_main💪" pic.twitter.com/twkcWBt73u
एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'Zee5 चे आभार. नवाजनं अतिशय चांगलं काम केलं आहे.'
हड्डी या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच अनुराग कश्यप, इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘हड्डी’ हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे.
गँग ऑफ वासेपूर, मंटो, ठाकरे, 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांना नवाजुद्दीन सिद्दीकीनं काम केलं. नवाजुद्दीन हा लवकरच 'नूरानी चेहरा' आणि 'अदभूत' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
संबंधित बातम्या