Actor Govinda Net Worth : गोविंदाने (Govinda) 'इल्जाम' (Ilzaam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनय आणि नृत्याने त्याने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. सध्या गोविंदाची क्रेझ कमी झालेली असली तरी गोविंदा नव्वदच्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेता होता. सध्या तो पूर्वीसारखं काम करत नसला तरी आजही तो कोट्यवधींचा मालक आहे.
गोविंदाची कमाई
गोविंदा सध्या रुपेरी पडद्यावर कमी झळकतो. एका सिनेमासाठी गोविंदा 2 ते 3 कोटींचे मानधन घेतो. तसेच जाहीरातींमधूनदेखील तो चांगली कमाई करत असतो. एका जाहीरातीसाठी गोविंदा 2 कोटींचे मानधन घेतो. दरवर्षी गोविंदा 10 ते 12 कोटींची कमाई करत असतो. गोविंदा जवळजवळ 170 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
गोविंदाच्या संपत्तीत एक आलिशान बंगलादेखील आहे. या बंगल्याची किंमत 16 कोटींच्या आसपास आहे. या आलिशान बंगल्यासह गोविंदाकडे आणखी दोन बंगले आहेत. यातील एक जुहूमध्ये तर दुसरा मड आयलॅंडमध्ये आहे.
गोविंदाचे कार कलेक्शन
गोविंदाचे कार कलेक्शन खूपच चांगले आहे. गोविंदाकडे फोर्ड एंडेवर (Ford Endevour) आणि मित्शुबिशी लांसरसह अनेक महागड्या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांमधून भटकायला गोविंदाला आवडते. गोविंदाकडे असलेल्या लक्झरी गाड्या त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
संबंधित बातम्या