Govinda : बॉलिवूड अभिनेता 'गोविंदा' (Govinda) गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. 90 च्या दशकात गोविंदाने रुपेरी पडद्यावर राज्य केले. 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे. गोविंदादेखील लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. 


झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला,"ओटीटी हे कलाकारांसाठीचे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म  एक्सप्लोर करायला मला आवडेल. नुकताच गोविंदा करिश्मा कपूरसोबत 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये दिसला होता.





2019 मध्ये रिलीज झालेल्या 'रंगीला राजा' सिनेमात गोविंदा मोठ्या पडद्यावर शेवटचा दिसला होता. गोविंदाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. माधुरी दीक्षित, सुष्मिता सेन, रवीना टंडन, करिश्मा कपूर, तब्बूसारख्या 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे.


संबंधित बातम्या


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध


World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha