Karan Johar Announce Govinda Naam Mera Film  : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. नुकतेच करणने त्याच्या 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) , अभिनेत्री भूमी पेडणेकर  (Bhumi Pednekar) आणि कियारा अडवाणी  (Kiara Adwani)  हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


करणने विकी कौशलचा गोविंदा नाम मेरा या चित्रपटातील लूक शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'हा आहे गोविंदा वाघमारे. याचं मनं सोन्यासारखं असून तो बोल्ड डान्स करतो. '





तर भूमी पेडणेकरचा हिरव्या साडीमधील हटके लूक शेअर करून करणने कॅप्शनमध्ये लिहीले, 'या आहेत मिसेस वाघमारे.  गोविंदा नाम मेरामधून या तुमच्या भेटीस येणार आहेत.'





कियारा अडवाणीच्या पिंक साडीमधील हॉट लूकचा फोटो शेअर करत करणने कॅप्शनमध्ये लिहीले, 'ट्वीस्टशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. गोविंदा नाम मेरा हे मनोरंजनाचं फूल पॅकेज आहे. '






Bigg Boss Marathi 3: जय की विशाल? 'बिग बॉस'चा नवा कॅप्टन कोण याचा आज फैसला 
'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील भूमी, कियारा आणि विकीचा लूक पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे.


विकी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटासोबतच 'सॅम बहादुर' या आगामी चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भूमी पेडणेकरचे  'रक्षाबंधन' आणि 'बधाई हो-2' हे चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.  'भूल भुलैया 2'  आणि 'जग जुग जियो' या चित्रपटांमध्ये कियारा दिसणार आहे. या तिघांची धमाल  'गोविंदा नाम मेरा' मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


Aryan Khan Birthday: ना अलिबाग, ना क्रूझ पार्टी, ना फॉरेन ट्रिप, गुपचूप केक कापून आर्यनचा बर्थडे!