Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसीचा टास्क सुरू आहे. जय आणि विशाल या टास्कमध्ये कॅप्टन पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे जय आणि विशालला समर्थन देण्यासाठी घरातील सदस्यांना अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. कालच्या भागात उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि दादूस यांनी जयला समर्थन दिले. तर मीनल, विकास, सोनाली आणि नीथा यांनी विशालला समर्थन दिले होते. त्यामुळे आजच्या भागात स्नेहा कोणाला समर्थन देणार त्यावर घराचा कॅप्टन कोण बनणार ते आधारित आहे. स्नेहा आणि जयची मैत्री बघता जय घराचा नवा कॅप्टन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.





बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सोनालीला अश्रु अनावर होणार आहेत. त्यामुळे विकास सोनालीला समजावताना दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन्सी टास्क दरम्यान विकासने विशालचे समर्थन करत टक्कल केले. विकासने टक्कल केल्यामुळे विशालला वाईट वाटले. त्यामुळे विशालनेदेखील टक्कल केले. तर जयच्या समर्थनासाठी दादूसनेदेखील टक्कल केले. आज घरामध्ये नीथा, विशाल, विकास, मीनल आणि सोनाली धमाल, मजा-मस्ती करताना दिसून येणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज उत्कर्ष आणि टीम कुजबूज करताना दिसणार आहेत.






बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य बराच काळ एकत्र असतात. त्यामुळे एकमेकांसोबत भांडण, वादविवाद, मतभेद होत असतात. आज घरामध्ये विशाल आणि मीनल मध्ये जोरदार भांडण होणार आहे. बिग बॉसच्या घरात कॅप्टन पद मिळणे हे सदस्यांसाठी खूप महत्तवाचे असते. त्यामुळे सदस्यांमध्ये या टास्क दरम्यान भांडणे होत असतात. पण आता बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन जय असू शकतो, अशी आशा वर्तवली जात आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 15: Bigg Boss OTT स्पर्धक Karan Nath करणार Salman Khan च्या बिग बॉस 15 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री


Aryan Khan Birthday: ना अलिबाग, ना क्रूझ पार्टी, ना फॉरेन ट्रिप, गुपचूप केक कापून आर्यनचा बर्थडे!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha