Raj Kapoor: चेंबूर येथील राज कपूर यांच्या बंगल्याची अखेर विक्री; 'या' कंपनीनं खरेदी केली प्रॉपर्टी
गोदरेज (Godrej) समूहाची रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजने (Godrej Properties) राज कपूर यांचा हा मुंबईतील चेंबूर भागातील बंगला विकत घेतला आहे.
Raj Kapoor: अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांचा मुंबईमधील चेंबूर येखील बंगला विकला गेला आहे. गोदरेज (Godrej) समूहाची रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजने (Godrej Properties) राज कपूर यांचा हा बंगला विकत घेतला आहे. ही कंपनी राज कपूर यांच्या बंगल्याच्या जागी प्रीमिअर रेसिडेंशियल प्रॉपर्टी बांधणार आहे, असं म्हटलं जात आहे. गोदरेज प्रॉपर्टीजनं ही जागा राज कपूर यांच्या कुटुंबाकडून विकत घेतली आहे, असं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये त्यांनी सांगितलं. गोदरेज प्रॉपर्टीजने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ही जमीन राज कपूर यांचे वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून खरेदी करण्यात आली आहे. गोदरेज प्रॉपर्टीजनं ही डिल किती रुपयांमध्ये केली, याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
राज कपूर यांचा बंगला देवनार फार्म रोड येथीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या जवळ आहे. या डीलबाबत गोदरेज प्रॉपर्टीजचे सीईओ गौरव पांडे यांनी सांगितलं, 'हा आयकॉनिक प्रोजेक्टला आमच्या पोर्टफोलियोमध्ये सामील झाल्यानं आम्ही आनंदी आहोत. यासाठी आम्ही कपूर कुटुंबाचे आभार मानतो. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला.'
पुढे त्यांनी सांगितलं, सध्याच्या काळात प्रीमियम प्रकल्पांच्या मागणीत वाढ झाली आहे. चेंबूरमधील या प्रकल्पात आम्ही मोठी रेसिडेंशियल प्रॉपर्टी उभारणार आहोत.'
राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर यांनी सांगितलं, 'चेंबूरमधील या प्रॉपर्टीसोबत आमचे भावनिक आणि ऐतिहासिक नाते आहे. आम्ही पुन्हा गोदरेज प्रॉपर्टीजसोबत जोडलो गेले आहोत, याचा आनंद आहे.'
2019 मध्ये, गोदरेज प्रॉपर्टीजने कपूर कुटुंबाकडून चेंबूरमधील प्रसिद्ध आरके स्टुडिओ विकत घेतला होता. या स्टुडिओच्या जागी गोदरेजनं आरकेएसच्या नावाने प्रमिअर मिक्स यूज प्रोजेक्ट विकसित केला जात आहे. हा प्रकल्प 2023 मध्ये डिलिव्हर केला जाणार आहे, असं म्हटलं जात आहे.
राज कपूर यांचे चित्रपट
राज कपूर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राज यांनी वयाच्या दहाव्या वर्षी इंकलाब या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले. त्यांच्या आवारा (Awara), श्री 420 (Shree 420) आणि बरसात (Barsaat) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 2 जून 1988 रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन-निर्मिती केली.
कपूर कुटुंबामधील अनेक सदस्य मनोरंजनक्षेत्रात काम करतात. करिना कपूर, करिश्मा, रणबीर कपूर या कपूर घराण्यातील तरुणी पिढीनं बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या :
Raj Kapoor : दिग्दर्शकाच्या एका थप्पडमुळे राज कपूर यांचे बदललं आयुष्य; जाणून घ्या किस्सा