Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते. 2022 मध्ये एका कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स स्टेप्स करत तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अश्लील अदांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. पण तरीही तिच्या प्रत्येक कार्यक्रमात वाद, गोंधळ होणं सुरुच राहिलं आहे. महाराष्ट्रात गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण ती नक्की आहे कोण? तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? असे अनेक प्रश्न जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


...अशी झाली गौतमीच्या संघर्षाला सुरुवात


धुळ्यात जन्मलेल्या गौतमी पाटीलचा आज महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. गौतमीचा सांभाळ तिच्या आईने आणि आजोबांनी केला आहे.  तिचे वडील व्यसनी असून ते आईला मारहाण करत असे. त्यामुळे तिची आई वडिलांचं घर सोडून माहेरी राहायला आली होती. आपले वडील कोण आहेत? ते काय करतात हे लहानपणी गौतमीला  माहीत नव्हतं. 


गौतमीचा सांभाळ करण्यासोबत घर चालवण्याची जबाबदारीदेखील तिच्या आईने सांभाळली होती. पण एकदा आईचा अपघात झाला आणि हे चक्र थांबलं. त्यानंतर घराची जबाबदारी गौतमीकडे आली. गौतमीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड नव्हती. अशातच पैसे कमावण्यासाठी तिने दहावीनंतर शिक्षण सोडलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने गौतमीच्या संघर्षाची सुरुवात झाली.


गौतमीने आठवीत असतानाचं पुणे गाठलं. पुण्यातील एका डान्स अकादमीमार्फत तिने नृत्य करायला सुरुवात केली. बॅक डान्सर म्हणून काम करायला तिने सुरुवात केली. पुढे या क्षेत्राची आवड निर्माण झाल्यानंतर तिने स्वत:चे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. 


गौतमी पाटीलला एका कठीण प्रसंगाचाही सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या प्रकरणावर तिने आवाजही उठवला. या सगळ्या गोष्टींवर मात करत ती पुन्हा एकदा मंच गाजवायला उभी राहिली.


सबसे कातील गौतमी पाटील... 


गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आपल्या नृत्याची झलक ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. 'सबसे कातील गौतमी पाटील' अशी तिची ओळख आहे. इंस्टाग्रामवर गौतमीचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. गौतमीचा 'घुंगरू' (Ghoogroo) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


संबंधित बातम्या


Gautami Patil: गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल; छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा इशारा