Sachin Tendulkar Was Signed Shah Rukh Khan Amitabh Bachchan Mohabbatein Movie : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आजही त्यांचे सिनेमे चाहते आवडीने पाहतात. दोघांची मुख्य भूमिका असलेला 'मोहब्बतें' (Mohabbatein) हा सिनेमा सिनेरसिक पुन्हा पुन्हा पाहतात. 23 वर्षांनंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमाची कथा, गाणी आणि किंग खानचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या बहुचर्चित सिनेमात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार होता.
यशराज फिल्मच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेला 'मोहब्बतें' हा एक चांगला सिनेमा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) महत्त्वाच्या भूमिकेत होते. यश चोप्रासोबतच्या वादानंतर बिग बींनी या सिनेमासाठी होकार दिला होता. सिनेमात ऐश्वर्याने अमिताभ यांच्या लेकीची भूमिका साकारली होती. पण आधी या सिनेमात लेकाचीदेखील एक भूमिका होती.
सचिन तेंडुलकर असणार होता 'मोहब्बतें' सिनेमाचा भाग
मीडिया रिपोर्टनुसार, क्रिकेटचा देव सचिन तेडुंलकरला 'मोहब्बतें' या सिनेमासाठी विचारणा झाली होती. क्रिकेटरनेही या सिनेमासाठी आपला होकार कळवला होता. अमिताभ यांच्या मुलाच्या भूमिकेत सचिन तेंडुलकर झळकणार होता. तर अमिताभ यांच्या पत्नीच्या भूमिकेत श्रीदेवी दिसणार होत्या. पण सिनेमाची वेळ वाढत चालल्याने या सिनेमातील काही सीन्स आणि पात्र वगळ्यात आली. त्यामुळे सचिन तेंडुलकरला हा सिनेमा करता आला नाही. ऐश्वर्याआधी लेकीच्या भूमिकेसाठी रानी मुखर्जी यांना विचारणा झाली होती.
'मोहब्बतें' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Mohabbatein Movie Details)
'मोहब्बतें' हा सिनेमा 2000 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख आणि अमिताभ पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकले. 13 कोटी रुपयांमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 90 कोटींची कमाई केली. या सिनेमात शाहरुख, अमिताभ आणि ऐश्वर्या यांच्यासह जिमी शेरगिल, शमिता शेट्टी, उदय चोप्रा, अमरीश पुरी, अनुपम खेर, अर्चना पूरन सिंह, किम शर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. वेगवेगळ्या पात्रांची प्रेमकथा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येईल.
संबंधित बातम्या