Gautami Patil Latest News: कायम विविध कारणाने चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलवर (Gautami Patil) छोटा पुढारी घन:श्याम दराडेनेदेखील (Ghanshyam Darade) टीका केली आहे. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल, असा इशारा घन: श्याम दराडेने दिला आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर घन:श्याम दराडे यांने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने गौतमीवर टीका केली.
राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे याने आज गौतमी पाटीलवर तोफ डागली. दराडे याचा 'मुसंडी' हा चित्रपट येणार असल्याने तो विठ्ठल दर्शनासाठी आला होता. सध्या गौतमी पाटीलवार टीका केली कि लगेच प्रसिद्धी मिळते याची जाणीव असल्याने तिच्यावर अनेकजण तोंड सुख घेताना दिसतात. तसाच प्रकार आज या छोट्या पुढाऱ्याने देखील केला. यापूर्वी देखील घनश्याम याने गौतमी हिच्यावर टीका केली होती. आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत असल्याचे घन:श्याम दराडेने म्हणत गौतमीने देखील आपला मुसंडी चित्रपट पाहावा असे आवाहन केले. मात्र लावणीला बदनाम करून महाराष्ट्राचा बिहार करायचा प्रयत्न केल्यास आपण मुसंडी मारू असा इशाराही त्याने दिला.
अजित पवारांचाही पक्षावर हक्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माझे खूप वेगळे नाते असल्याचे सांगत दादा कधीही प्रवाहात गटांगळ्या खाणारे नेते नाहीत, असेही दराडेने म्हटले. अजित पवार हे शरद पवार यांना कधीही सोडून जाणार नाहीत. उलट राष्ट्रवादी जसा शरद पवार यांचा आहे, तसाच अजितदादांचाही पक्ष असल्याचे घनश्याम याने सांगितले. उलट दादा आता जनतेच्या आशीर्वादाने मुख्य खुर्चीवर मुसंडी मारतील असेही त्याने सांगितले.
नाशिकमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात राडा
नाशिकमध्ये मंगळवारी, 16 मे रोजी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी तरुणांच्या एका गटाने हुल्लडबाजी केली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातदेखील गोंधळ झाला आणि खुर्च्या उलटवण्यापर्यंत प्रकार घडले होते. तरुणांना नियंत्रित न करता आल्याने हा प्रकार घडला होता. आता मंगळवारी हाच प्रकार घडला. त्यामुळे गौतमी पाटील आणि गोंधळ ही परंपरा कायम राहिली.
नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मर्यादित होते. मात्र सर्वच प्रेक्षक स्टेजजवळ जमा झाल्याने एकच गर्दी झाली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था असली तरी कार्यक्रमाला आलेल्यांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पाहण्यासाठी कोणताच अडथळा नको होता. याचवेळी कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेले दोन्ही पत्रकार हे व्यासपीठाजवळ जातच तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली.