Dil Ka Gehna : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) आणि गायक परमिश वर्माचे (Parmish Verma)  'दिल का गहना' (Dil Ka Gehna) हे प्रेमगीत प्रदर्शित करण्यात आले आहे. हे प्रेमगीत गायक यासर देसाई यांनी गायले आहे. तर राणा सोटल यांनी लिहिले आहे.





 


'दिल का गहना' हे गाणं 1940 च्या दशकातील प्रेमावर भाष्य करणारं आहे. अगम मान आणि अजीम मानने या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. देशभक्ती आणि प्रेमकहानी असा दुहेरी संगम गाण्यात आहे. गौहर म्हणाली,'दिल का गहना' या गाण्याने मला 1940 च्या दशकातील आजी-आजोबांबद्दल विचार करायला भाग पाडलं. त्या काळातील पंजाबी मुलीची भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक होते."



गौहरचे 'दिल का गेहना' हे गाणं 1940 च्या तरुण पिढीच्या प्रेमावर भाष्य करणारे आहे.  परमीश म्हणाला, हे गाणं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रिलीज झाल्याचा मला अभिमान वाटतो. 'दिल का गेहना' हे गाणं देसी म्युझिक फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या


Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीला 14 वर्षांनंतर दिलासा, रिचर्ड गिअर चुंबन प्रकरणाचा लागला निकाल


Bigg Boss 15 Grand Finale Date : 'या' तारखेला होणार बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले, कोण आहेत फायनलिस्ट जाणून घ्या...


Badhaai Do Trailer : समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणी मांडणारा 'बधाई दो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर झाला प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha