Badhaai Do Trailer : राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या 'बधाई दो' (Badhai Do) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील कॉमेडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणीवर सिनेमा भाष्य करणार आहे.
'बधाई दो' सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. सिनेमात राजकुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून भूमी पेडणेकर पीटी शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा आधी 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर दोघांनीही सोशल मीडियावर सिनेमाचा ट्रेलर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
या चित्रपटात सीमा पाहवा, शीबा चढ्ढा आणि लवलीन मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हर्षवर्धन कुलकर्णीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्राच्या 'बधाई हो' सिनेमाचा 'बधाई दो' हा सिक्वेल असणार आहे.
संबंधित बातम्या