Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलासा दिला आहे. 2007 साली राजस्थानातील एका जाहीर कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गिअरने चुंबन घेतल्याच्या प्रकरणात शिल्पाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी अश्लीलतेचा गुन्हा शिल्पावर दाखल झाला होता. मात्र तब्बल 14 वर्षांनंतर शिल्पाची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. 


काय होतं प्रकरण?
2007 साली राजस्थानातील एका जाहीर कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गिअरने शिल्पाचे चुंबन घेतले होते. त्यामुळे एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल 14 वर्षांनी अश्लीलतेच्या गुन्ह्यातून शिल्पा शेट्टीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अशाप्रकारे शिल्पाला दंडाधिकारी न्यायालयाने दिलासा दिला आहे.






शिल्पा शेट्टीने कलम 239 आणि 245 अंतर्गत गुन्ह्यातून निर्दोष मुक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. शिल्पाने तिच्या अर्जात म्हटले होते की, रिचर्डने घेतलेल्या चुंबनाला मी विरोध केला नाही. याचा अर्थ असा नाही की मी कोणत्याही कटात किंवा गुन्ह्यात सहभागी आहे.


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या तब्येतीत अंशत: सुधारणा, ट्वीट करत दिली माहिती


Bigg Boss 15 Grand Finale Date : 'या' तारखेला होणार बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले, कोण आहेत फायनलिस्ट जाणून घ्या...


KGF2 ते Brahmastra पर्यंत 'हे' सात बिग बजेट सिनेमे 2022 मध्ये होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt]