Bigg Boss 15 Finale Date : बिग बॉस 15 (Bigg Boss 15) चा गेम आता एका रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. स्पर्धकांचं लक्ष आता फक्त ट्रॉफीकडे आहे. जर तुम्हीसुद्धा बिग बॉसचे फॅन असाल तर तुमच्यासाठी ही खूप उत्सुकतेची बातमी आहे. बिग बॉसचा फिनाले याच आठवड्यात होणार आहे. पण, जर तुम्ही शोच्या फिनालेची तारीख आणि विजेत्याचे बक्षीस याबद्दल गोंधळात असाल तर आम्ही बिग बॉसशी संबंधित संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 


कधी होणार बिग बॉस 15 चा फिनाले?


तर, येत्या 30 जानेवारीला बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले होणार आहे. हा बिग बॉस 15 चा शेवटचा आठवडा आहे. या शो चे शेवटचे भाग शनिवारी आणि रविवारी प्रसारित केले जातील. तर विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात येईल.  


हे आहेत बिग बॉस 15 चे फायनलिस्ट


खरंतर बिग बॉसचा गेम हा खूप कठीण गेम मानला जातो. कारण इथे शक्तीपेक्षा युक्तीनेच खेळ पुढे जातो. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बिग बॉसच्या घरात आपलं स्थान टिकवून ठेवणं फार कठीण आहे. याच आव्हानाला स्विकारून आता बिग बॉस 15 चे फायनलिस्ट ठरले आहेत. त्यामध्ये राखी सावंत, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट्ट आणि रश्मी देसाई यांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण सात स्पर्धक बिग बॉस 15 च्या शेवटच्या आठवड्यात पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. आता या सात स्पर्धकांपैकी कोण ती मानाची ट्रॉफी पटकावणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. 


बिग बॉस 15 बक्षिसाची रक्कम 
या सीझनची खास गोष्ट म्हणजे बिग बॉस 15 चा विजेता किती पैसे घरी नेईल हे आत्तापर्यंत कोणालाही माहित नाही. खरंतर, बिग बॉसची ट्रॉफी मिळवणं यातंच खरं यश मानलं जातं. परंतु, बक्षिसाच्या रकमेबद्दल अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही.  


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha