Gadima Puraskar 2021 : ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना यंदाचा म्हणजेच 2021 चा गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 14 डिसेंबरला गदिमा यांची 44 वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे 14 डिसेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाना पाटेकर यांना 'गदिमा पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या गृहिणी सखी सचिव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जाहीर झाला आहे. 


ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रज्ञा पुरस्कार नवोदित गायिका रश्मी मोघे यांना जाहीर करण्यात आला आहे. गीतरामायणकार गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांची 14 डिसेंबर रोजी 44 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.


सामाजिक कार्याची आवड असलेले नाना पाटेकर 'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोपासत आहेत. मनोरंजन सिनेसृष्टीसह समाजातील त्यांच्या योगदानासाठी 'गदिमा पुरस्कार' त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.  या पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. या बरोबरच शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त 13 विध्यार्थ्यांना गदिमा पारितोषिक देण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या


Filmfare Awards 2021 Winners : दिवंगत इरफान खान, तापसी पन्नू आणि 'हे' कलाकार आहेत 'फिल्मफेअर पुरस्कार 2021' चे मानकरी


मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, नाना पाटेकर, संजय राऊतांसह 'या' दिग्गजांचा गौरव


In Pics: राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा पुरस्कार प्रदान, महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश


World Record : T-Series चा विक्रम! 20 कोटीहून अधिक सबस्क्रायबर्स असणारे भारताचे पहिले YouTube चॅनल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha