Sara Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडूलकरने (Sara Tendulkar) मॉडलिंग क्षेत्रात एन्ट्री केली आहे. नुकताच साराने एका क्लोदिंग ब्रँडच्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला. या जाहिरातीमधून साराने मॉडेलिंग क्षेत्रात डेब्यू केला आहे. 
 
साराने शेअर केलेल्या जाहिरातीमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री बनिता संधू आणि  तानिया श्रॉफ या दोघी दिसत आहे. साराने शेअर केलेल्या या जाहिरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सराने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर केवळ 4  तासातच या व्हिडीओला 50 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करून साराला शुभेच्छा दिल्या आहेत. 






साराने शेअर केलेल्या जाहिरातीच्या व्हिडीओमधील  बनिता संधू ही  ब्रिटीश आणि भारतीय अभिनेत्री आहे. 2018 मधील प्रदर्शित झालेल्या  'ऑक्टोबर'  या चित्रपटामधून बनिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. बनिताने  सरदार उधम या चित्रपटात रेश्मा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे बनिताला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.  


महत्त्वाच्या बातम्या :


Vicky Katrina Wedding : लग्नातील फुटेजसाठी विकी-कतरिनाला तब्बल 100 कोटींची ऑफर


Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya Divorce : घटस्फोटानंतर समंनथाने व्यक्त केल्या भावना; म्हणाली...