In Pics: राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा पुरस्कार प्रदान, महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर गिर्यारोहक प्रियांका मोहितेला तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
यावर्षी 12 खेळाडूंना 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' तर 35 खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' जाहीर झाले होते. यासह 'द्रोणाचार्य' श्रेणीतील 'जीवनगौरव पुरस्कार' आणि 'नियमित द्रोणाचार्य पुरस्कार' असे एकूण 10 खेळाडूंना पुरस्कार जाहीर झाले होते.
अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता.