Filmfare Awards 2021 Winners : 2021 हे वर्ष बॉलीवूड उद्योगासाठी पुनरागमनाचे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणेच यंदादेखील मुंबईत फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात तापसी पन्नूच्या 'थप्पड' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर दिवंगत इरफान खान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 


फिल्मफेअर पुरस्कार 2021


सर्वोत्कृष्ट चित्रपट : तापसी पन्नूच्या 'थप्पड' सिनेमाने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पुरस्कार पटकावले. 


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'तानाजी: द अनसंग वॉरिअर' (Tanhaji) सिनेमाचे दिग्दर्शक 'ओम राऊत' यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अभिनेत्री 'तापसी पन्नू'ला 'थप्पड' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.


सर्वोत्कृष्ट अभिनेता (सहाय्यक भूमिका) : सैफ अली खानला ओम राऊतच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटातील अभिनयासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा' पुरस्कार मिळाला.


सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम : प्रीतमला नेटफ्लिक्सवरील लुडो (Ludo) चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. 


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) : हा पुरस्कार राघव चैतन्य यांना 'थप्पड का एक तुकडे धूप' या गाण्यासाठी देण्यात आला आहे.


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) : 'मलंग' चित्रपटातील 'हुई मलंग' या शीर्षक गीतासाठी असीस कौरला हा पुरस्कार देण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या


Vicky Katrina Wedding : विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाचं 'वऱ्हाड निघालं राजस्थानला'


World Record : T-Series चा विक्रम! 20 कोटीहून अधिक सबस्क्रायबर्स असणारे भारताचे पहिले YouTube चॅनल


Katrina Kaif Video : कतरिना कैफच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी अडवली गाडी


Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला ईडीने बजावले समन्स, 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची होणार चौकशी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha