Birju Maharaj : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बॉलिवूडच्या अनेक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन पंडित बिरजू महाराज यांनी केले होते. 'गदर' या सुपरहिट सिनेमातील गाण्याचे नृत्य दिग्दर्शनदेखील पंडित बिरजू महाराज यांनी केले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते. पंडित बिरजू महाराजांच्या निधनानंतर अनिल शर्मांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गदर सिनेमातील 'आन मिलो सजना' या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन पंडित बिरजू महाराज यांनी केले होते. तर अजय चक्रवर्ती आणि बेगम परवीना सुल्तान यांनी गे गाणे गायले होते. चित्रपटातील आठवणींना उजाळा देत अनिल शर्मा म्हणाले, पंडित बिरजू महाराजांनी सिनेमातील शास्त्रीय गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करावे, अशी माझी मनापासून इच्छा होती. त्यासाठी मी पंडित बिरजू महाराजांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटायला गेलो होतो. चित्रपटातील 'आन मिलो सजना' या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्याआधी त्यांनी सिनेमाचे कथानक, पटकथा याचा अभ्यास केला. त्यानंतरच त्यांनी नृत्यदिग्दर्शन करण्यास होकार दिला".
अनिल शर्मा पुढे म्हणाले,"पंडित बिरजू महाराजांसारखी शैली कोणाकडेही नव्हती आणि कधीही नसेल. ते वेगळेच होते. त्यांचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत आहे".
बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती.
संबंधित बातम्या
Birju Maharaj : माधुरीचं काहे छेड मोहे... ते दीपिकाचं मोहे रंग दो लाल; बॉलिवूडच्या 'या' गाण्यांचं बिरजू महाराजांकडून नृत्यदिग्दर्शन
Birju Maharaj : पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर शोककळा; पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून श्रद्धांजली
Birju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha