Birju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. त्यांनी बॉलिवूडमधील काही गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले होते.
मोहे रंग दो लाल
बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दीपिका पादुकोणवर चित्रीत झालेले मोहे रंग दो लाल या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन पंडित बिरजू महाराज यांनी केले होते. या गाण्यातील दीपिकाच्या क्लासिकल डान्सनं अनेकांची मनं जिंकली होती.
काहे छेड मोहे
बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी माधुरी दिक्षीतच्या देवदास या चित्रपटातील काहे छेड मोहे या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन बिरजू महाराज यांनी केले आहे. देवदास या चित्रपटातील सर्वंच गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
जगावे सारी रैना
डेढ इश्किया या चित्रपटातील जगावे सारी रैना या गाण्याचे देखील नृत्य दिग्दर्शन पंडित बिरजू माहाराज यांनी केले आहे. या गाण्यामधील माधुरीच्या एक्सप्रेशन्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
उन्नई कनाडू नान
विश्वरुपम या चित्रपटातील उन्नई कोडू नान या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन पंडित बिरजू माहाराज यांनी केले आहे. या गाण्यात अभिनेता कमल हसनला कथ्थक करताना पाहून अनेक जण थक्क झाले होते.
पंडित बरजू महाराज यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक सेलिब्रिटी तसेच नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ' पंडित बरजू महाराज यांच्या निधनानं खूप दु:ख झाले. त्यांनी भारतीय नृत्य कलेची जगभरात विशेष ओळख निर्माण केली. '
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Birju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा